होय. केवळ वेळ नोंदणी असलेल्या स्पर्धा प्रकारांसाठी (Timed Races) स्पर्धेचा प्रकार बदलण्याची विनंती स्वीकारली जाईल.
स्पर्धेच्या तारखेच्या ३० दिवस आधीपर्यंत म्हणजेच १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंतच स्पर्धेचा प्रकार बदलण्याची विनंती करता येईल.
यासाठी स्पर्धकाने
info@vvmm.in या ई-मेल पत्त्यावर लेखी विनंती पाठवावी.
स्पर्धेच्या प्रकारानुसार नोंदणी शुल्कामध्ये फरक असल्यास, स्पर्धकाने बदललेल्या स्पर्धा प्रकारासाठी प्रथम नवीन नोंदणी करावी. त्यानंतर पूर्वीच्या नोंदणी शुल्काच्या परताव्यासाठी ई-मेलद्वारे विनंती करावी.
वसई-विरार महापौर मॅरेथॉन २०२६ साठी प्रत्येक स्पर्धकाला स्पर्धेचा प्रकार बदलण्याची विनंती केवळ एकदाच करता येईल.